आता हाच आमचा संसार....; सोनाली कुलकर्णीनं दुबईत साजरी केली दिवाळी, पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:40 AM2022-10-25T11:40:33+5:302022-10-25T11:46:55+5:30

Sonalee Kulkarni : लक्ष्मीपूजनाचे काही फोटो सोनालीनं शेअर केले आहेत. या फोटोंना तिने दिलेलं कॅप्शन फारच सुंदर आहे.

मराठमोळी अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही दिवाळसण साजरा केला. यंदाची दिवाळी सोनालीनं दुबईत साजरी केली.

सोनाली व तिचा पती कुणाल बेनोडेकर सध्या दुबईत आहे. या जोडप्यानं मराठमोळ्या पद्धतीने दुबईत दिवाळसण साजरा केला.

दिवाळीच्या दिवशीच्या लक्ष्मीपूजनाचे काही फोटो सोनालीनं शेअर केले आहेत. या फोटोंना तिने दिलेलं कॅप्शन फारच सुंदर आहे.

देशाबाहेर असूनही सोनालीने दिवाळीच्या तयारीत कोणतीच कसर सोडली नाही. अगदी रांगोळी पासून घर सजावटी पर्यंत सगळं सोनाली आणि कुणालने मिळून केले.

यंदा पहिल्यांदाच दिवाळी आमच्या घरी साजरी करत आहोत. माहेर नाही सासर नाही आमचं घर... पूजेची सगळी तयारी, पूजा मांडणे, करणे,दिवाळी ची सजावट, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर, अगदी दोन दिवसात,दोन माणसांत... आता हाच आमचा संसार...,’असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. कुणाल हा कामानिमित्त दुबईत स्थायिक झाला आहे.

सोनाली आणि कुणालने लॉकडाऊनमध्ये लग्न केलं होतं. दुबईत दोघांनी साधेपणाने लग्नगाठ बांधली होती. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय किंवा मित्र कोणीच हजर राहू शकले नव्हते.

त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी सोनाली आणि कुणालने पुन्हा कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित थाटामाटात लग्न पार पाडलं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.