सबसे कातिल गौतमी पाटीलच्या बालपणीचा फोटो पाहिलंत का?, दिसायची खूपच गोंडस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:50 AM2023-06-08T09:50:18+5:302023-06-08T09:56:44+5:30

कलाकार कोणताही असो त्यांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आपला आवडता कलाकार बालपणी कसा दिसत होता हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

कलाकार कोणताही असो त्यांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आपला आवडता कलाकार बालपणी कसा दिसत होता हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

नाही ओळखलंत..अहो..सर्वांना आपल्या अदांनी वेड लावणारी सबसे कातिल गौतमी पाटील आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.

तिच्या प्रत्येक कार्यक्रमात तुडूंब गर्दी असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर गौतमी पाटील हे नावं चर्चेत आलं.

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप गौतमीवर करण्यात आला आणि त्यानंतर गौतमी पाटीलचं नाव कायमच चर्चेत राहिलं.

सबसे कातिल गौतमी पाटील...असे तिचे चाहते म्हणतात. तसेच तिला खान्देश कन्याही म्हणतात.

राजकारणांच्या कार्यक्रमांपासून ते बर्थ डे पार्ट्यांसाठी गौतमी पाटीलला आमंत्रणं येऊ लागलीत. गौतमीच्या एका महिन्यातील सगळ्या तारख्या फुल्ल होऊ लागल्या आहेत.

गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी दीड ते दोन लाख रुपये मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे.

गौतमी पाटील आणि तिच्या टीममध्ये या मानधनाचे वाटप झाले तरी गौतमी महिन्याला जवळपास ३०-३५ लाख रूपये कमावते.

गौतमी पाटील लवकरच घुंघरू सिनेमात झळकणार आहे.