हिरोची एण्ट्री! ऊर्मिला निंबाळकरने शेअर केली बाळाची पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 13:42 IST2021-10-06T13:33:09+5:302021-10-06T13:42:16+5:30
Urmila nimbalkar: उत्तम अभिनय आणि लाघवी स्वभावामुळे ऊर्मिलाचा आज प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं.

'नमस्कार मंडळी! मी ऊर्मिला..' असं म्हणतं युट्यूबवर धुमाकूळ घालणारी प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेत्री म्हणजे ऊर्मिला निंबाळकर.
उत्तम अभिनय आणि लाघवी स्वभावामुळे ऊर्मिलाचा आज प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहणारी ऊर्मिला काही दिवसांपूर्वीच आई झाली असून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
ऊर्मिला- सुकिर्तच्या बाळाविषयी माहिती मिळाल्यानंतर प्रत्येक चाहता या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक होता.
चाहत्यांची उत्सुकता अधिक काळ न ताणता उर्मिलाने नुकतीच तिच्या बाळाची पहिली झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवली आहे.
ऊर्मिला- सुकिर्तने एक ब्लॉग करुन त्यांच्या बाळाची ओळख करुन दिली. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर बाळाचे काही फोटो शेअर केले आहेत.
बाळाचा जन्म झाल्यानंतर एका महिन्याने ऊर्मिलाने बाळाचं छान फोटोशूट केलं आहे.
पुण्यातील एका प्रसिद्ध फोटोग्राफरकडून हे फोटोशूट करण्यात आलं आहे.
उर्मिलाने अभिनेत्री आणि त्यानंतर युट्यूब कंटेट क्रिएटर अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
प्रवास, लाइफस्टाइल, फॅशन यांसारख्या विषयांवर ती आणि तिचा पती मिळून व्हिडीओ बनवत असतात.
उर्मिलाने 'दुहेरी' या मराठी मालिकेत भूमिका साकारली होती. तसंच तिने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलंय.
दिया और बाती हम, मेरी आशिकी तुमसे ही यांसारख्या मालिकेत ती झळकली. त्यानंतर उर्मिलाने 'संगीत सम्राट' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन गायक रोहत राऊतसोबत मिळून केलं.