मराठीतील फिट अभिनेता अशोक शिंदे आता कसे दिसतात माहितीये? फोटो पाहून जाल चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 13:19 IST2022-07-26T13:15:04+5:302022-07-26T13:19:39+5:30

Ashok shinde: कलाविश्वात फारसे सक्रीय नसलेले अशोक शिंदे यांनी आजही त्यांचा फिटनेस जपला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पाहिल्यावर एखादा २० वर्षाचा तरुणदेखील लाजेल.

मराठी कलाविश्वातील चिरतरुण अभिनेता म्हणजे अशोक शिंदे. आजवर अशोक शिंदे यांनी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

एका मेकअप आर्टिस्टचा लेक असलेल्या अशोक यांनी इलेक्ट्रिकल्स शाखेची पदवी घेतल्याचं सांगण्यात येतं. मात्र, त्याचं मन अभिनयात जास्त रमलं, ज्यामुळे त्यांची पावलं आपोआप अभिनय क्षेत्राकडे वळली.

रुबाबदार पर्सनालिटी, देखणा चेहरा यांच्या जोरावर त्यांनी अल्पावधीत तरुणींच्या मनावर राज्य केलं.

कधी नायक तर कधी खलनायक होऊन त्यांनी प्रत्येक भूमिका गाजवली.

दामिनी, घरकुल, सुवासिनीची सत्व परीक्षा, दुहेरी, छत्रीवाली, लालबागची राणी, रंगत संगत, जखमी कुंकू, भक्ती हीच खरी शक्ती, काकण, मेनका उर्वशी अशा कितीतरी चित्रपटांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली.

सध्या अशोक यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, त्यांच्या फिटनेसची कायम चर्चा होताना दिसते.

कलाविश्वात फारसे सक्रीय नसलेले अशोक शिंदे यांनी आजही त्यांचा फिटनेस जपला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पाहिल्यावर एखादा २० वर्षाचा तरुणदेखील लाजेल.

आजही अशोक शिंदे नेमाने वर्कआऊट करत असल्याचं सांगण्यात येतं.

अशोक शिंदे यांच्या पत्नीचं नाव पूजा शिंदे असं असून त्यांना नेहा आणि योजना या दोन लेकीदेखील आहेत. (All photos: ashok shinde facebook page)