पहिलं घटस्फोट, मग आशुतोष राणांसोबत दुसरं लग्न; नात्यातील चढउतारांबद्दल पहिल्यांदाच बोलल्या रेणुका शहाणे By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 06:00 AM 2023-03-04T06:00:00+5:30 2023-03-04T06:00:00+5:30
Renuka Shahane : अभिनेत्री रेणुका शहाणे प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. नुकतेच त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. हम आपके है कौन चित्रपटातून अभिनेत्री रेणुका शहाणे घराघरात पोहचल्या. रेणुका शहाणे अभिनेत्रीशिवाय उत्तम दिग्दर्शिकाही आहेत.
अभिनेत्री रेणुका शहाणे प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. नुकतेच त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. यामध्ये त्यांनी आपल्या पहिल्या घटस्फोटाबाबत आणि दुसऱ्या लग्नाबाबतही सांगितले.
पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाल्या की, माझे आईवडील जेव्हा वेगळे झाले. त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर पडला. तेव्हा आजूबाजूचे लोक आपल्या मुलांना माझ्यासोबत खेळण्यापासून रोखायचे.
इतकेच नाही तर शिक्षकांनीही माझ्यासोबत असेच काहीसे केले होते. त्रिभंगामध्ये त्या चिमुकल्या मुलीसोबत जे घडते, ज्यामध्ये तिला तिच्या आईबद्दल विचारले जाते, ते खरोखर माझ्या आयुष्यातही घडले आहे.
रेणुका शहाणे यांनी आपल्या पहिल्या लग्नाबाबत सांगितले. त्या म्हणाल्या की, माझे पहिले लग्न विजय केंकरे यांच्यासोबत झाला होता. त्यानंतर आमचा घटस्फोट झाला.
घटस्फोट झाल्यानंतर रेणुका शहाणे यांचे लग्नबद्दल फारसे चांगले मत नव्हते. कारण आधी आईबाबांचा घटस्फोट आणि त्यानंतर आपला.
त्यानंतर त्या आशुतोष राणा यांच्या प्रेमात पडल्याचे रेणुका शहाणे यांनी सांगितले. मात्र दुसऱ्या लग्नावेळी माझे वय ३५-३६ होते. त्यावेळी मी नात्यातील चढउतारांना चांगल्या प्रकारे हाताळू शकत होते, असेही त्यांनी सांगितले.
कोणताही गाजावाा न करता अगदी साध्या पद्धतीने रेणुका शहाणे यांनी आशुतोष राणा यांच्यासोबत मंदिरात लग्न केले.
रेणुका आणि आशुतोष यांना दोन मुले आहेत. त्यांच्यासोबतचे ते फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.