Flower Lady in Cannes marathi actress Chhaya Kadam's stunning look
कान्समध्ये Flower lady ची कमाल; छाया कदमचा जबरदस्त लूक By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 02:20 PM2024-05-28T14:20:21+5:302024-05-28T14:29:32+5:30Join usJoin usNext Chhaya Kadam: कान्समध्ये छाया कदम चांगल्याच लाइमलाइटमध्ये होत्या. सध्या कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये छाया कदम हे एकच नाव चर्चिलं जात आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर छाया कदम यांनी थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलपर्यंत बाजी मारली आहे. अलिकडेच छाया कदम यांनी ७७ वा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांना स्टाँडिंग ओवेशन मिळालं. नाकात नथ आणि आईची साडी नेसून छाया कदम कान्सच्या रेड कार्पेटवर गेल्या. त्यामुळे त्या विशेष प्रकाशझोतात आल्या. नुकतंच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. काळ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंट असलेल्या गाऊनमध्ये त्यांनी हे फोटोशूट केलं आहे. या लूकमध्ये त्या प्रचंड कॉन्फिडंट आणि सुंदर दिसत आहेत. छाया कदम यांचा हा ग्लॅमरस लूक नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांचं कौतुक करत आहेत.टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीटिव्ही कलाकारबॉलिवूडकान्स फिल्म फेस्टिवलcinemaCelebrityTV Celebritiesbollywoodcannes film festival