पूजा सावंतच्या घरी गणरायाचं आगमन, संपूर्ण कुटुंबाने केली मनोभावे पूजा, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 11:09 AM2024-09-08T11:09:12+5:302024-09-08T11:24:14+5:30

मराठी तारे तारकांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत.

गणरायांच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मनोरंजन विश्वातहीसेलिब्रिटींनी वाजत गाजत गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे.

खास गणेशोत्सवासाठी अभिनेत्री पूजा सावंत ही तिचा पती सिद्धार्थसह ऑस्ट्रेलियावरून भारतात आली आहे.

तिने सोशल मीडियावर घरच्या बाप्पा सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "गणपती बाप्पांसोबत… आम्हीही आमच्या घरी आलो 🇮🇳 Home coming गणपती बाप्पा मोरया".

पूजाच्या घरच्या बाप्पाची साध्या पद्धतीने पण रेखीव अशी सजावट केली आहे. त्याच्या या फोटोंना चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.

यात तिचे संपूर्ण देशमुख कुटुंब गणरायाच्या भक्तीत लिन झालेले दिसत आहे. यावेळी कुटुंबातील सदस्यांचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला.

लाल रंगाच्या साडीत पुजाचं सौंदर्य खुलून आलं आहे. कुर्ता पायजम्यात सिद्धार्थ उठून दिसतोय. नेहमीप्रमाणेच दोघंही अगदी शोभून दिसत आहेत.

पूजा सावंतचा नवरा हा अभिनेता नसून एका ऑस्ट्रेलियातील एका कंपनीत कामाला आहे.

लग्न झाल्यापासून पूजाही ऑस्ट्रेलियात पतीसोबत राहते आहे. कधी-कधी कामानिमित्त ती महाराष्ट्रात येत असते.