Genelia Deshmukh : जेवणात तेलाचा वापरच करत नाही जिनिलीया देशमुख, मग स्वयंपाक कसा करतात वहिनी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 02:43 PM2024-08-05T14:43:51+5:302024-08-05T15:22:21+5:30

Genelia Deshmukh Birthday : तेलाशिवाय जेवण बनवते देशमुखांची सून, जिनिलीयाचा स्वयंपाकाचा मास्टर key माहितीये?

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे केवळ सिनेसृष्टीतलेच नाही तर महाराष्ट्राचेही आदर्श आणि लाडके कपल आहेत. महाराष्ट्राच्या या लाडक्या वहिनींचा आज वाढदिवस आहे.

रितेशबरोबर लग्न केल्यानंतर जिनिलीया ही पूर्णपणे महाराष्ट्रीयन झाली आहे. तिला महाराष्ट्रीयन पदार्थही आवडतात.

अभिनयाबरोबरच जिनिलीया उत्तम स्वयंपाकही करते. तिला स्वयंपाकाची आवड असून जेवणात अजिबात तेल वापरत नसल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला होता.

"मला पिटलं भाकरी खूप आवडते. मी हेल्थ कॉन्सियस आहे. आणि महाराष्ट्रीयन फूड हे खूप हेल्दी आहेत. आपण जास्त तेल आणि तूप वापरत नाही".

"मी जेव्हा जेवण बनवते तेव्हा मी जेवणात तेल वापरतच नाही. तेलाऐवजी मी शेंगदाण्याचे कूट वापरते. कारण, त्याला तेल सुटतं. त्याची चवही मग छान लागते", असं जिनिलीयाने सांगितलं होतं.

त्याबरोबरच पुरणपोळी आवडत असल्याचंही जिनिलीयाने सांगितलं. तसंच अनेक महाराष्ट्रीयन पदार्थही ती उत्तमरित्या बनवते.

जिनिलीयाच्या वाढदिवशी रितेशनेही खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.