International Yoga Day : अमृता खानविलकरसारखा फिटनेस हवाय? अभिनेत्रीच्या योगा पोझ पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:27 PM2024-06-21T12:27:26+5:302024-06-21T12:33:56+5:30

योगा दिनाच्या निमित्ताने अमृता खानविलकरने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

२१ जून हा दिवस सर्वत्र आंतराष्ट्रीय योगा दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. अनेक सेलिब्रिटी योगा दिनाचं औचित्य साधत योगाचं महत्त्व पटवून देतात.

अनेक सेलिब्रिटी फिट अँड फाईन राहण्यासाठी नियमिग योगा करतात. अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील फिटनेससाठी योगा करते.

योगा दिनाच्या निमित्ताने अमृता खानविलकरने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अमृता खानविलकरने विविध योगा पोझेस या फोटोमध्ये दिल्याचं पाहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये अमृताचा फिटनेस आणि योगा पोझ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

अमृताने हे फोटो शेअर करत योगाचं महत्त्व पटवून देणारी पोस्ट लिहिली आहे. याबरोबरच तिने चाहत्यांना खास टिप्सही दिल्या आहेत.

"१ तास नाही तर केवळ १५ मिनिटांपासून योगा स्टार्ट करा", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अमृताच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृता तिच्या फिटनेसकडे विशेष लक्षही देताना दिसते.