भावी पतीसह मानसी नाईकचे प्री-वेडिंग फोटोशूट, कुणालाही घायाळ करेल असा आहे रोमँटिक अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 04:06 PM 2021-01-08T16:06:28+5:30 2021-01-08T16:16:08+5:30
सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यांत अभिनेत्री मानसी नाईकचा उल्लख करावा लागेल. गेले अनेक दिवस अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
मानसीने तिच्या वाढदिवसाला प्रेमाची कबुली दिली होती, त्यानंतर दोघांनी साखरपुडासुद्धा केला.
आता मानसीच्या लग्नाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.
आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे मानसी आणि तिच्या पतीने ठरवले आहे.
मानसी आणि तिच्या पतीनेेसुद्धा आपल्या लग्नाआधी रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटचे काही फोटो मानसीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
दोघांचा हा रोमँटिक अंदाज घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.
मानसी नाईक १९ जानेवारीला लग्न करणार आहे. तिनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.
प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. तर मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत.