सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही मागे टाकते प्रसाद ओकची पत्नी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 01:43 PM2022-03-28T13:43:32+5:302022-03-28T13:48:33+5:30

Manjiri oak: मंजिरीला सुद्धा अभिनयाची आवड असल्याने भावाच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रसाद ओक.

अभिनयापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रसादने आता दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

प्रसाद कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट आणि कुटुंबाविषयीची माहिती शेअर करत असतो.

प्रसाद ओकच्या पत्नीचं नाव मंजिरी ओक असं आहे.

मंजिरी बिझनेस वूमन असून ती अनेक ब्रँडसोबत कोलॅबोरेशनदेखील करत असते.

सध्या मंजिरी कलाविश्वातही नशीब आजमावत आहे. प्रसादसोबत ती असिस्टंट डायरेक्टरचंही काम करते.

जमावत आहे. प्रसादसोबत ती असिस्टंट डायरेक्टरचंही काम करते.

मंजिरी अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरी लग्नबंधनात अडकले होते. प्रसादचा भाऊ हा मंजिरीचा मित्र होता.

मंजिरीला सुद्धा अभिनयाची आवड असल्याने भावाच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती. साधारण तीन महिने ही कार्यशाळा होती. त्याच काळात दोघांमधील मैत्री वाढली आणि ते प्रमात पडले.