Subodh Bhave: पडद्यामागे राहून अभिनेता सुबोध भावेला सावलीसारखी साथ देणारी मंजिरी; पाहा खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:35 IST2022-12-01T13:08:29+5:302022-12-01T13:35:18+5:30
लाईमलाईटपासून दूर राहणाऱ्या मंजिरी यांनी नुकतंच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय.

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणून सुबोध भावे(Subodh Bhave)ची ओळख आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
कलाविश्वाप्रमाणेच सुबोध भावे सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
त्यामुळे अनेकदा तो त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट वा अन्य गोष्टींची माहिती नेटकऱ्यांना देत असतो.(फोटो इन्स्टाग्राम)
सुबोध अनेकवेळा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करतो. यावेळी त्याने त्याच्या पत्नीचा फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
''वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंज्या फक्त प्रेम..'', असं कॅप्शन देत त्याने पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला.(फोटो इन्स्टाग्राम)
सुबोधच्या पत्नीचं मंजिरी भावे यांनी नुकतंच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
झी मराठीवर २१ डिसेंबरपासून सुरु होणार 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?' मालिकेची निर्मिती मंजिरी भावे यांनी केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
सुबोधप्रमाणे मंजिरीही सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
अनेकवेळा मंजिरी संपूर्ण कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. (फोटो इन्स्टाग्राम)