अभिनेत्री होण्यापूर्वी अभिज्ञा भावे करायची 'या' क्षेत्रात काम; तुम्हाला माहितीये का तिच्या पहिल्या जॉबविषयी? By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:48 PM 2022-02-11T12:48:33+5:30 2022-02-11T12:51:24+5:30
Abhidnya bhave: तेजाज्ञा या नावाने अभिज्ञा आणि तेजस्विनी पंडित या दोघी कपड्यांचा ब्रँड चालवतात. परंतु, या व्यवसायापूर्वीही अभिज्ञा एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होती. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे या मालिकांच्या माध्यमातून अभिज्ञा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.
कलाविश्वाप्रमाणेच अभिज्ञा सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच बऱ्याचदा ती पर्सनल लाइफविषयीदेखील काही गोष्टी शेअर करत असते.
अभिज्ञा लवकरच तू तेव्हा तशी या मालिकेत झळकणार आहे. एक व्हिडीओ शेअर करत नुकतीच तिने ही माहिती दिली. तेव्हापासून तिच्या करिअरविषयी नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
मराठी कलाविश्वातील ही लोकप्रिय अभिनेत्री एकेकाळी अन्य एका दुसऱ्या क्षेत्रात करिअर करत होती हे फार मोजक्या जणांना माहित आहे.
सध्या अभिज्ञा अभिनेत्री असण्यासोबतच एक उद्योजिकादेखील आहे. तिचा स्वत:चा कपड्यांचा ब्रँड आहे.
तेजाज्ञा या नावाने अभिज्ञा आणि तेजस्विनी पंडित या दोघी कपड्यांचा ब्रँड चालवतात. परंतु, या व्यावसायापूर्वीही अभिज्ञा एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होती.
फार मोजक्या लोकांना माहित असेल की अभिज्ञा एकेकाळी हवाईसुंदरी म्हणजेच एअर हॉस्टेस होती.
परंतु, तिच्यातील अभिनय तिला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तिने एअर हॉस्टेसची नोकरी सोडून कलाविश्वात नशीब आजमावलं.
आज अभिज्ञा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.