बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही 'चंद्रमुखी'चा थाट, अशा कातिल अदा की हटणार नाही नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:29 PM2024-10-28T12:29:53+5:302024-10-28T12:35:17+5:30

'चंद्रमुखी'चा बोल्ड अंदाज, अमृताच्या फोटोंनी चाहते घायाळ

अमृता खानविलकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी सिनेसृष्टीतील या चंद्रमुखीने बॉलिवूडही गाजवलं आहे.

अमृताचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

अमृताने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये अमृताच्या कातिल अदा दिसत आहे. तिच्या या फोटोंवरुन नजर हटत नाहीये.

अमृताचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

अमृताने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. चंद्रमुखी, कट्यार काळजात घुसली, साडे माडे तीन, जीवलगा, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हे तिचे काही गाजलेले सिनेमे.

तर राझी, रंगून, सत्यमेव जयते अशा हिंदी सिनेमांमध्येही ती झळकली आहे.