झक्कास! एक नंबर!! भार्गवी चिरमुलेचा नवा लुक पाहिलात का? पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 04:55 PM 2022-09-08T16:55:34+5:30 2022-09-08T17:00:38+5:30
Bhargavi Chirmuley : भार्गवी चिरमुले हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अनेक मराठी हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये आपण तिचा अभिनय पाहिला आहेच. सध्या मात्र चर्चा भार्गवीच्या नव्या लुकची आहे. भार्गवी चिरमुले हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अनेक मराठी हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये आपण तिचा अभिनय पाहिला आहेच. सध्या मात्र चर्चा भार्गवीच्या नव्या लुकची आहे.
होय, भार्गवीने नव्या लुकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती एकदम वेगळी दिसतेय.
भार्गवीनं नवीन हेअरकट केला आहे. लांब केस कापून तिने केस शॉर्ट केलेत. पण या हेअरकटमध्येही ती कमालीची सुंदर दिसतेय.
अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या नव्या लुकवर कमेंट्स केल्या आहेत. मंजिरी ओक, क्रांती रेडकर, सुकन्या मोने,मनवा नाईक, ऋतुजा बागवे, मानसी नाईक, शिवानी बावकर आदींनी तिचा लुक आवडल्याचं म्हटलं आहे.
व्वा, एक नंबर, भारी दिसतेय अशा कमेंट्स चाहत्यांनी दिल्या आहेत. काहींनी तिची मजाही घेतली आहे. छोटी बच्ची हो क्या, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
भार्गवी सोशल मीडियावरही सक्रीय असते. वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे फोटो क्षणात व्हायरल होतात.
भार्गवी फिटनेस प्रेमी आहे. डान्स आणि वर्कआऊट या तिच्या आवडत्या गोष्टी आहे. वर्कआऊटचे अनेक व्हिडीओही ती शेअर करत असते.
भार्गवी सध्या ती कलर्स मराठीवरील ‘आई मायेचं कवच’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने आईची भूमिका साकारली आहे.
भार्गवीने आतापर्यंत वहिनीसाहेब, चार दिवस सासूचे, अनुबंध, असंभव, जागो मोहन प्यारे यांसारख्या मालिकांत काम केले आहे.