बोल्ड अन् ग्लॅमरस! 'इलू इलू' सिनेमातील अभिनेत्रीचा हटके अंदाज, फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:21 IST2025-04-04T16:57:28+5:302025-04-04T17:21:03+5:30

'इलू इलू' सिनेमातील अभिनेत्रीचा हटके अंदाज, नेटकरी म्हणाले...

'बिग बॉस' मराठी पर्व-३ मधून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरात पोहोचली. या शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

मीरा जगन्नाथ तिच्या चित्रपटांसह हटके फॅशनसेन्समुळे देखील चर्चेत येते.

अभिनेत्री मीरा जगन्नाथने 'माझ्या नवऱ्याची बायको','ठरलं तर मग', अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.

अलिकडेच ती 'इलू इलू' चित्रपटात झळकली होती.

सध्या मीरा जगन्नाथने समुद्रकिनारी केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिने हे खास फोटो क्लिक केले आहेत.

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.