"आम्ही तर काळजात बसणार, ते पण रूबाबात..."; गुढीपाडव्याला मानसी नाईकचा मराठमोळा 'स्वॅग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 18:48 IST2024-04-09T18:15:15+5:302024-04-09T18:48:36+5:30
Manasi Naik Gudhipadwa Saree Look: फोटोंसोबतच तिने लिहिलेलं सूचक कॅप्शन चांगलंच चर्चेत आहे

मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी आपल्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री मानसी नाईकदेखील यापैकी एक आहे.
‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या अशा लोकप्रिय आयटम साँगमुळे अभिनेत्री मानसी नाईक प्रकाशझोतात आली.
गुढीपाडव्यानिमित्त मानसीने सुंदर पारंपरिक लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
मानसीने गडद गुलाबी रंगाची नक्षीकाम केलेली सुंदर साडी आणि जांभळ्या रंगाचा स्टायलिश ब्लाऊज परिधान केला आहे.
या साजासोबतच तिने गळ्यात नाजूक हार, कपाळी चंद्रकोर, हातात मॅचिंग बांगड्या घातल्याने तिचा लूक अधिकच उठून आला आहे.
मराठमोळा साज, त्यावर अप्रतिम शृंगार आणि मराठमोळ्या लूकमध्ये तिने दिलेल्या पोज सध्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत.
फोटोसह मानसीने 'नजरेत तुम्ही बसा, आम्ही तर काळजात बसणार ते पण रूबाबात' असे दमदार कॅप्शनही दिले आहे.
तसेच, 'प्रेम, हास्य आणि आशीर्वादांनी भरलेल्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा', असेही तिने त्यासोबत लिहिले आहे.