marathi actress married to non marathi partners some left career after marriage
'या' मराठी अभिनेत्रींनी निवडले अमराठी जोडीदार, एकीने लग्नानंतर करिअरला केला रामराम By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 02:10 PM2023-03-27T14:10:58+5:302023-03-27T14:17:14+5:30Join usJoin usNext 'एका अभिनेत्रीचा तर लग्नावरुन विश्वासच उडाला होता पण...' सेलिब्रिटी आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य हा कायमच चर्चेचा विषय असतो. बॉलिवूडच नाही तर मराठी कलाकारांबद्दलही जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. त्यातही अनेक अशा मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी अमराठी जोडीदार निवडले आहेत. कोण आहेत त्या अभिनेत्री बघुया मराठी सिनेसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने 2015 मध्ये हिमांशू मल्होत्राशी (Himanshu Malhotra) लग्नगाठ बांधली. हिमांशू हिंदी मालिकांमध्ये काम करतो. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. करिअरला महत्व देत दोघेही वेगवेगळे राहतात मात्र तरी त्यांचं नातं आजही टिकून आहे. 'हम आपके है कौन' मधील सलमानची लाडकी भाभी म्हणजेच अभिनेत्री रेणुका शहाणेने (Renuka Shahane) अभिनेते आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांच्यासोबत 2001 साली लग्न केले. रेणुका शहाणे यांचं हे दुसरं लग्न. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्यांचा लग्नावरुन विश्वास उडाला होता. मात्र आशुतोष राणा यांनी आपल्या सहजसुंदर स्वभावाने त्यांना प्रेमात पाडले. आज त्यांना दोन मुलं आहेत. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांनी बॉलिवूड अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) यांच्याशी लग्न केले होते. तेव्हा हे लग्न फारच चर्चेचा विषय ठरले कारण त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. मात्र तरी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. यानंतर मुलगा प्रतिकच्या जन्मानंतर काहीच दिवसात स्मिता पाटील यांचं निधन झालं. 'वास्तव' सिनेमातून प्रसिद्धीस आलेली मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) हिने 2005 मध्ये साऊथ सुपरस्टार महेशबाबूसोबत (Mahesh Babu) संसार थाटला. लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम केला. नम्रताने 1993 साली मिस इंडिया चा किताब जिंकला. यानंतर तिने महेशबाबूसोबत एका दाक्षिणात्य चित्रपटात काम केले. तेव्हाच दोघांमध्ये प्रेम फुलले आणि काही वर्षातच त्यांनी लग्न केले. 'बिनधास्त' या मराठी सिनेमातील गौतमी आठवतेय? होय गौतमी गाडगीळ (Gautami Gadgil) तिचं नाव. गौतमीने काही सिनेमांमध्ये भूमिका केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. हिंदी मालिकेतील आघाडीचा अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) सोबत तिने 2003 साली लग्नगाठ बांधली. एका मालिकेच्या सेटवरच त्यांची ओळख झाली होती. यानंतर दोघेही अनेकदा एकमेकांना भेटत राहिले आणि एक दिवस रामने गौतमीला मागणी घातली. आज त्यांना एक मुलगी आहे. मराठी मालिका 'जावई विकत घेणे आहे' मधील प्रांजलची भूमिका साकारणारी अभिनेत्री तन्वी पालव (Tanvi Palav) हिने मलाळ्यम अभिनेता सिद्धार्थ मेननसह (Siddharth Menon) संसार थाटला आहे. 2020 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघंही लग्नाआधी अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. सिद्धार्थ केरळचा असून त्यांनी साऊथ आणि महाराष्ट्रीयन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. 'टाईमपास सिनेमात 'ही पोळी साजूक तुपातली' गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली मराठमोळी शिवानी दांडेकर (Shibani Dandekar) हिने बॉलिवूड निर्माता, लेखक, अभिनेता फरहान अख्तरसोबत (Farhan Akhtar) लग्न करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. फरहान अख्तरने पहिली पत्नी अधुनासोबतचा 17 वर्षांचा संसार मोडून शिवानीशी लग्नगाठ बांधली. 2022 साली त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्माला आलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिने 2002 मध्ये निर्माता गोल्डी बेहेलसोबत (Goldie Behl) लग्नगाठ बांधली. सोनालीने अद्याप मराठीमध्ये काम केलेले नाही मात्र ती ९० च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. लग्नानंतर ती संसारात रमली आणि तिचं काम करणं कमी झालं.टॅग्स :मराठी अभिनेताबॉलिवूडलग्नदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टMarathi ActorbollywoodmarriageLove Story