मराठी अभिनेत्रीने शेअर केले स्विमिंगपूलमधील हॉट फोटो, म्हणते- "जगाचा विचार करत बसलो तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 02:02 PM2024-06-09T14:02:04+5:302024-06-09T14:05:10+5:30

मेघाने स्विमिंगपूलमधील तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लावणीच्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी लावणीसम्राज्ञी म्हणजे मेघा घाडगे. नृत्यांगणा असण्याबरोबरच मेघा उत्तम अभिनेत्रीदेखील आहे.

अनेक सिनेमांमध्ये मेघाने काम केलं आहे. 'पछाडलेला', 'चल धर पकड', 'पोपट' अशा सिनेमांमधून तिने अभिनयाची चुणूक दाखवली.

मेघा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते.

नुकतेच मेघाने स्विमिंगपूलमधील तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

"लख लख उन्हाची! जगाचा विचार करीत बसलो तर स्वतःसाठी जगणार कधी?", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

मेघाचे हे हॉट फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

"खुपच सुंदर स्माईल मॅडम", "निळया पाण्यातील दिवस", "Hotness overloaded" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, मेघाची अनेक लावणी गाणी सुपरहिट झाली आहेत. 'बिग बॉस मराठी'मध्येही मेघा सहभागी झाली होती.