'चांद तू नभातला..'; सिंपल लूकमध्ये खुललं मृण्मयीचं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:28 PM2024-05-30T12:28:18+5:302024-05-30T12:33:31+5:30

Mrunmayee Deshpande: मृण्मयीच्या प्रत्येक लूकला चाहत्यांची पसंती मिळत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. अल्पावधीत तिने लोकप्रियता मिळवली आहे.

अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये मृण्मयी झळकली आहे. त्यामुळे तिने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर लोकप्रियता मिळवली आहे.

मृण्मयी सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.

मृण्मयी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे नेटकरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मृण्मयी अभिनेत्री असण्यासोबतच दिग्दर्शकादेखील आहे. मन फकिरा या सिनेमाचं दिग्दर्शन तिने केलं होतं.

मृण्मयी गेल्या काही काळापासून महाबळेश्वरला स्थायिक झाली असून ती शेतामध्ये वेगवेगळी पिकं घेताना दिसत आहे.

मृण्मयीने नुकतंच एक सुरेख फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

मृण्मयीच्या प्रत्येक लूकला चाहत्यांची पसंती मिळत असते.