साज ह्यो तुझा..! ठसठशीत मोत्यांचे दागिने अन् मराठमोळा साज; मृण्मयी देशपांडेचा लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 14:50 IST2024-03-18T14:50:00+5:302024-03-18T14:50:00+5:30
Mrunmayee deshpande: मृण्मयीचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे (murnmayee deshpande).
उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर मृण्मयीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
आजवरच्या कारकिर्दीत मृण्मयीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
मृण्मयी अभिनेत्री असण्यासोबतच दिग्दर्शकादेखील आहे. मन फकिरा या सिनेमाचं दिग्दर्शन तिने केलं होतं.
मृण्मयी गेल्या काही काळापासून महाबळेश्वरला स्थायिक झाली असून ती शेतामध्ये वेगवेगळी पिकं घेताना दिसत आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सोशल मीडियावर मृण्मयीचं फोटोशूट चर्चेत येत आहे. या फोटोमध्ये तिचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
मृण्मयीचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो.