अशोक सराफ यांची पत्नी आहे यशस्वी बिझनेस वूमन; जाणून घ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या व्यवसायाविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:34 PM2022-01-04T16:34:29+5:302022-01-04T16:38:54+5:30

Nivedita saraf: साड्यांच्या किंमती जास्त असल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही डिझायन साड्या खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे कमीत कमी किंमतीमध्ये त्या ग्राहकांना डिझायनर साड्या उपलब्ध करुन देतात.

मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ. 'नवरी मिळे नवऱ्याला', 'धुमधडाका', 'माझा छकुला', 'अशी ही बनवाबनवी' या आणि अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

अलिकडेच त्या 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यात त्यांनी आसावरी ही भूमिका साकारली होती.

निवेदिता सराफ यांनी जवळपास ३० वर्षांपेक्षा अधिक काळ कलाविश्वात काम केलं आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.

विशेष म्हणजे निवेदिता सराफ या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच यशस्वी उद्योजिकादेखील आहेत.

निवेदिता सराफ यांचा स्वत:चा साड्यांचा ब्रँड असून गेल्या कित्येक वर्षांपासून त्या हा व्यवसाय करत आहेत.

'हंसगामिनी' असं निवेदिता यांच्या ब्रँडचं नाव असून त्या स्वत: यातील प्रत्येक साडी डिझाइन करतात.

साड्यांच्या किंमती जास्त असल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही डिझायन साड्या खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे कमीत कमी किंमतीमध्ये हंसगामिनी ग्राहकांना डिझायनर साड्या उपलब्ध करुन देतात.

सुरुवातीला त्यांनी अनेक ठिकाणी या साड्यांचं प्रदर्शन ठेवलं होतं. तसंच या व्यवसायातून अनेक गरजू महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर त्यांच्या हंसगामिनी या ब्रँडचं पेज असून त्यावर त्या त्यांच्या साड्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.

अनेक मराठी सेलिब्रिटीदेखील त्यांच्याकडून आवर्जुन साड्यांची खरेदी करतात.