"सहा महिन्यांपूर्वी मी आणि सिद्धेशने...", पूजा सावंतची पोस्ट, शेअर केले लग्नातील Unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:20 AM2024-08-28T11:20:16+5:302024-08-28T11:23:40+5:30

पूजा आणि सिद्धेश चव्हाणने २८ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती. पूजाच्या वैवाहिक जीवनाला ६ महिने पूर्ण झालेत.

मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल पूजा सावंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. पूजाने काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

पूजाच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने पूजाने लग्नातील काही Unseen फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

पूजा आणि सिद्धेश चव्हाणने २८ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती. पूजाच्या वैवाहिक जीवनाला ६ महिने पूर्ण झालेत.

"सहा महिन्यांपूर्वी मी आणि सिद्धेशने या प्रवासाला सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रत्येक दिवस हा उजळून निघाला आहे", असं पूजाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे ती म्हणते, "तुम्ही दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद यासाठी आम्ही आभारी आहोत".

पूजाने लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर करत ही पोस्ट केली आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पूजा आणि सिद्धेश यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पूजाचा पती सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. लग्नानंतर पूजादेखील ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे.

लग्नानंतर अभिनेत्रीने कामातून काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच ती कामानिमित्त भारतात आली होती.