सैराट झालं जी...! सध्या कुठे आहे रिंकू? अकलूजमध्ये 'या' ठिकाणी करतीये उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 02:56 PM2024-05-31T14:56:34+5:302024-05-31T15:01:40+5:30

Rinku rajguru: एकीकडे सेलिब्रिटी उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विदेशवाऱ्या करत आहेत. तर, रिंकू मात्र, कुठेही दूर गेलेली नाही.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

'सैराट', 'मेकअप', 'कागर', 'आठवा रंग प्रेमाचा', 'झिम्मा 2' अशा कितीतरी सिनेमात ती झळकली आहे.

पहिल्याच सिनेमाच्या माध्यमातून ती घराघरात लोकप्रिय झाली.

रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.

नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे तिचं हे समर स्पेशल फोटोशूट आहे.

एकीकडे सेलिब्रिटी उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विदेशवाऱ्या करत आहेत. तर, रिंकू मात्र, तिच्या घरीच सुट्टी घालवत आहे.

रिंकू सध्या अकलुजमध्ये तिच्या घरी आहे. त्यामुळे घरीच तिने फोटोशूट केलं आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या असं कॅप्शन देत तिने हे फोटोशूट केलं आहे.