Sai Tamhankar : आम्ही रात्री पार्टी केली आणि..., सई ताम्हणकरने पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 02:47 PM2022-11-09T14:47:39+5:302022-11-09T14:52:53+5:30

Marathi Actress Sai Tamhankar : सई ताम्हणकर ही मराठी इंडस्ट्रीतील बिनधास्त अभिनेत्री. आता सईने तिच्या स्वभावानुसार असेच बिनधास्त खुलासे केले आहेत.

सई ताम्हणकर ही मराठी इंडस्ट्रीतील बिनधास्त अभिनेत्री. आता सईने तिच्या स्वभावानुसार असेच बिनधास्त खुलासे केले आहेत.

होय, सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत सईने अनेक खुलासे केलेत. अगदी पर्सनल लाईफबद्दलही ती बोलली.

या मुलाखतीत सईने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दलही खुलासा केला. मी जेव्हा आता माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीला भेटते, त्याच्याशी बोलते. त्या भावना मी शब्दांत व्यक्त करू श्कत नाही, असं ती म्हणाली.

ज्या दिवशी तिचा व तिच्या पतीचा घटस्फोट झाला, त्यादिवशीबद्दलही तिने सांगितलं. ती म्हणाली, ज्या दिवशी दोघांनीही कोर्टामध्ये जाऊन सही केली त्याचदिवशी आम्ही पार्टी केली. आम्ही मित्र-मंडळींसाठी पार्टी ठेवली आणि या पार्टीत आम्ही वेगळं होत असल्याचं, घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं होतं.

पूर्वाश्रमीच्या पतीच्या नावाचे टॅटूही मी काढले आहेत. अजूनही ते टॅटू तसेच आहेत. त्याची लाज कसली? नातं संपलं म्हणून त्या नात्याच्या आठवणी पुसून टाकण्यामध्ये काय अर्थ? एक वेळ अशी येते की जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही करता. पण ते लपवण्याची गरज नाही. म्हणूनही आजही ते टॅटू मी मिरवते, असं सई म्हणाली. या उत्तरानंतर सिद्धार्थ कननही सईचं कौतुक केलं.

ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करताना कधी एकटेपणा जाणवतो का? यावरही ती बोलली. बिल्कुल, मलाही अनेकदा एकटेपणा जाणवतो. शेवटी मी सुद्धा एक माणूस आहे. माझ्याही काही भावनिक गरजा आहे. काम हा तुमच्या आयुष्याचा भाग आहे, आयुष्य नाही, हे समजायला मला बराच वेळ लागला. पण आता मला ते समजलंय, असं सई म्हणाली.

‘रेड कार्पेटवर किंवा एखाद्या कार्यक्रमात तू गेलीस आणि मीडियाने कॅमेरा दुसरीकडे फिरवला, असं कधी झालं आहे का?,’ असा प्रश्न सईला या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर तिने होकारार्थी उत्तर दिलं.‘हो, असं माझ्यासोबत घडलं आहे. यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यातच हे घडलं. मला पाहून काही मीडिया आणि इनफ्ल्यूएन्सरनी त्यांचे कॅमेरे दुसरीकडे फिरवले,’असं सई म्हणाली. त्यांची नाव सांगण्यास मात्र तिने नकार दिला. मी त्यांची नावं सांगू शकत नाही, असं ती म्हणाली.

रेड कार्पेटवर असं डावल्यावर नेमकं काय वाटलं? असं विचारल्यावर ती म्हणाली, ‘निश्चितपणे हा प्रकार दुखावणारा असतो. अशा डावलण्याचं दु:ख वाटणं स्वाभाविक आहे. पण खरं सांगू, अशा प्रकारामुळे मला अधिक बळ मिळत. अशा गोष्टी मला नवी ऊर्जा देऊन ातात. अशा अपमानाला आपण आपल्या कामानेच उत्तर देऊ शकतो. एक दिवस असा येईल की ही माणसं माझ्यासाठी येतील आणि मी तिथून निघून जाईल.’