Sai Tamhankar: सई ताम्हणकरने गोंदवलेल्या तारखांमागचा अर्थ काय? पहिल्या नवऱ्याशी खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 02:16 PM2024-08-02T14:16:31+5:302024-08-02T15:15:12+5:30

सई ताम्हणकरने उलगडलं टॅटूमागचं रहस्य, पहिल्या नवऱ्याशी आहे खास कनेक्शन

मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. अभिनयाबरोबरच सई तिच्या बोल्डनेस आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

अनेकदा सई तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते. या फोटोंमधील सईच्या खांद्यावर असलेल्या टॅटूचीदेखील बऱ्याचदा चर्चा रंगताना दिसते.

सईने खांद्यावर एक टॅटू गोंदवून घेतला आहे. या टॅटूमध्ये काही तारखा असल्याचं दिसत आहे. या टॅटूमागचं गुपित सईने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सईच्या खांद्यावरील हा टॅटूचं अभिनेत्रीच्या पहिल्या नवऱ्याशी कनेक्शन आहे. या टॅटूबद्दल सांगताना सई म्हणाली होती, "या तारखांचा माझ्या नवऱ्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी या तारखा माझ्यासाठी स्पेशल होत्या".

"पण या तारखा ज्याच्यासाठी गोंदविल्या होत्या. ती व्यक्तीच आयुष्यात राहिली नाही. त्यामुळे आता फक्त तारखा आणि आठवणी राहिल्या आहेत", असं ती म्हणाली होती.

२०१३ साली सईने व्यावसायिक अमेय गोसावी यांच्याशी लग्न केलं होतं. पण, अवघ्या दोनच वर्षांत त्यांचा संसार मोडला. २०१५ साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.

सईच्या लग्नाची आणि घटस्फोटाचीदेखील खूप चर्चा रंगली होती. नवऱ्यापासून वेगळं होऊनही सईने या हा टॅटू तसाच ठेवला आहे.

अनेकदा सई तिच्या फोटोशूटमध्ये तिच्या उजव्या खांद्यावरील हा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते.