Photos: समिधा गुरुचं 'खण'खणीत नाणं; जुन्या पॅटर्नला दिला वेस्टर्न टच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 07:17 PM2021-10-06T19:17:29+5:302021-10-06T19:28:30+5:30

Samidha guru : ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या वास्तववादी चित्रपटासाठी समिधाला राज्य पुरस्कारही मिळाला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समिधा गुरु. आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर समिधाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. (photos : samidha guru instagram)

नाटक, मालिका, चित्रपट अशा प्रत्येक माध्यमातून समिधा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

कलाविश्वाप्रमाणेच समिधा सोशल मीडियावरही सक्रीय असते. यात अनेकदा ती तिचे काही ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

कलाविश्वाप्रमाणेच समिधा सोशल मीडियावरही सक्रीय असते. यात अनेकदा ती तिचे काही ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

पडद्यावर सोज्वळ अभिनेत्रीची भूमिका साकारणारी समिधा खऱ्या आयुष्यात तितकीच बोल्ड आणि बिंधास्त आहे. त्यामुळे अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.

अलिकडेच समिधाने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं असून यात तिने पारंपरिक खणाच्या ड्रेसला वेस्टर्न टच दिला आहे.

समिधाचे खणाच्या ड्रेसमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चिले जात असून अनेकांनी तिच्या स्टाइल स्टेटमेंटचं कौतुक केलं आहे.

समिधा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने काही हिंदी मालिका, चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या वास्तववादी चित्रपटासाठी समिधाला राज्य पुरस्कारही मिळाला आहे.

समिधा गुरुला फोटोशूट करायची विशेष आवड असून ती तिच्या प्रत्येक फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.