जांभळा रंग अन् मनमोहक अप्सरा; सोनाली कुलकर्णीचा नवरात्री स्पेशल लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 02:10 PM2023-10-22T14:10:14+5:302023-10-22T14:15:52+5:30

सोनाली कुलकर्णीच्या मनमोहक अदांना मिळतेय चाहत्यांची पसंती

सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम दिसत आहे. देवी आईच्या आगमनाचा हा सण उत्साहाने साजरा केला जात आहे.

या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात.

आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे. नऊ मानाच्या रंगांपैकी आज ‘जांभळा’ या रंगाचा दिवस आहे.

अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी हिने खास लाल जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खासं फोटोशूट केले आहे.

साधा मेकअप, केसांची वेणी या लुकमध्ये सोनाली प्रचंड सुंदर दिसत आहे.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा हा लूक पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.

तिच्या या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

नवरात्रीच्या नऊ दिवसानिमित्त नवनवीन फोटोशूट करुन सोनाली चर्चेत आहे. सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच सजग असते.

सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. अभिनयाबरोबच सोनाली उद्योजिका देखील झाली आहे.

पंजाबी आई आणि मराठी वडिलांच्या पोटी जन्मलेल्या सोनालीने अभिनय क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना मराठी इंडस्ट्रीत लांबचा पल्ला गाठला आहे.