'ज़िंदगी का अब गम नही'; असं का म्हणतीये सोनाली? नेमकं झालंय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 06:05 PM2023-07-27T18:05:27+5:302023-07-27T18:09:44+5:30

Sonalee kulkarni: सोनालीने मराठी कलाविश्वात अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात खासकरुन तिच्या ऐतिहासिक, पौराणिक भूमिका विशेष गाजल्या.

मऱाठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर सोनालीने प्रेक्षकांना आपलंसं केलं.

सोनाली उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली नृत्यांगनादेखील आहे. बऱ्याचदा ती नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरसोबतच डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.

सोनाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

सोनाली कायम नवनवीन फोटोशूट करुन चर्चेत येत असते. यातील काही फोटो ती चाहत्यांसोबतही शेअर करते.

सध्या नेटकऱ्यांमध्ये सोनालीचं असंच एक फोटोशूट चर्चेत आलं आहे. सोनालीने ब्लॅक अँड व्हाइट कलरमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटमधील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

सोनालीने या फोटोला दिलेलं कॅप्शन चर्चेत येत आहे. तिने अमृता प्रीतम यांची एक कविता या फोटोच्या कॅप्शनमध्ये दिली आहे.

सोनालीने मराठी कलाविश्वात अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात खासकरुन तिच्या ऐतिहासिक, पौराणिक भूमिका विशेष गाजल्या.