अप्सरेच्या सौंदर्याची जादू, मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नव फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 04:01 PM2024-09-02T16:01:49+5:302024-09-02T16:12:55+5:30

सोनालीवरुन हटणार नाही तुमची नजर!

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं.

सोनाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

सोनाली कायम नवनवीन फोटोशूट करुन चर्चेत येत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये सोनालीचं असंच एक फोटोशूट चर्चेत आलं आहे.

नुकतंच सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केलेत.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाली सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

या वेस्टर्न ड्रेसवर सोनालीने परिधान केलेला नेकलेस हा विशेष आकर्षण ठरत आहे.

तिच्या या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर याचवर्षी सोनालीनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली.

२५ जानेवारीला सोनालीचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं.

सोनाली ही चालू घडामोडींविषयी परखड मत व्यक्त करत असते. शिवाय ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देखील देत असते.