सोनाली कुलकर्णीच्या खट्याळ अदा, करी जीवाला घायाळ...; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:30 PM2021-09-22T12:30:40+5:302021-09-22T12:36:33+5:30

Sonalee Kulkarni : सोनालीने इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटोही दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टावरचे तिचे रोज नवे फोटो पाहून चाहते पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडतात.

आता सोनालीने इन्स्टाग्रामवर नवीन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटोही दृष्ट लागावी इतके सुंदर आहेत.

लाल रंगाचा जंपसूट, मोकळे केस... तिचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. यात सोनाली वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय.

सोनालीच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स देत आहेत. सुंदर, अप्रतिम अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णीच्या ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाच्यी चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.

संजय जाधव दिग्दर्शित आणि सचित पाटील, सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला.