स्वानंदीच्या फोटोवर खिळल्यात हजारोंच्या नजरा; म्हणाली, 'बघत्यात..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:56 IST2024-06-10T13:52:41+5:302024-06-10T13:56:42+5:30
Swanandi berde: स्वानंदी या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत असून अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

स्वानंदी बेर्डे हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी नवीन नाही. दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेकी स्वानंदी आज सगळ्यांच्या परिचयाची आहे.
आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदीनेही मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे.
सोशल मीडियावर स्वानंदीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.
अलिकडेच स्वानंदीने एक फोटोशूट केलं आहे. साडी नेसून तिने केलेलं फोटोशूट चर्चेत आलं आहे.
स्वानंदी या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत असून अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
स्वानंदीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून त्याच्यावर काळ्या रंगाने सुरेख नक्षीकाम करण्यात आलं आहे.
'बघत्यात' असं कॅप्शन देत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.