झोकात पार पडलं उर्मिला निंबाळकरच्या लेकाचं बारसं; पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 17:46 IST2021-11-10T17:39:59+5:302021-11-10T17:46:47+5:30
Urmila Nimbalkar: "बाळामुळे घराचं गोकुळ होतं, असं का म्हणतात, ते आज कळलं, एका मऊसुत सशानं आमच्या सर्वांच्या आयुष्यात अथांग सुख आणलंय!", असं कॅप्शन देत उर्मिलाने तिच्या बाळाचं नाव सांगितलं.

लोकप्रिय मराठमोठी अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे उर्मिला निंबाळकर. आजच्या घडीला उर्मिलाचं नाव ठावूक नाही अशी एकही व्यक्ती नाही. मराठीमध्ये उत्तम कंटेंट क्रिएट करण्यासाठी उर्मिला प्रसिद्ध आहे.
प्रत्येकाला आपल्यातली आणि जिव्हाळ्याची वाटणारी उर्मिला नुकतीच आई झाली आहे. अलिकडेच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
विशेष म्हणजे उर्मिलाप्रमाणेच तिचं लहानसं बाळही सोशल मीडियावर चर्चेत येत असून या बाळाविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो.
ससा, पिल्लू, मऊसूत व्यक्ती अशा कित्येक टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या उर्मिलाच्या चिमुकल्याचं अलिकडेच थाटात बारसं पार पडलं.
उर्मिलाने या बारशाचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच बाळाचं सुंदर नावही चाहत्यांना सांगितलं आहे.
"बाळामुळे घराचं गोकुळ होतं, असं का म्हणतात, ते आज कळलं, एका मऊसुत सशानं आमच्या सर्वांच्या आयुष्यात अथांग सुख आणलंय!", असं कॅप्शन देत उर्मिलाने तिच्या बाळाचं नाव सांगितलं.
उर्मिलाच्या बाळाचं नाव अथांग असं ठेवण्यात आलं असून अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत पुण्यातील ठेपेवाडा इथे उर्मिलाचं डोहाळजेवण पार पडलं होतं.
उर्मिलाने तिचा प्रेग्नंसी काळ उत्तमरित्या एन्जॉय केला होता. यावेळचे काही ग्लॅमरस फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.