९ वर्ष BMC तर २५ वर्ष बँकेत केली नोकरी, टीव्हीवर खाष्ट सासू दिसणाऱ्या उषा नाडकर्णींचं शिक्षण माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 16:44 IST2025-04-22T16:40:31+5:302025-04-22T16:44:53+5:30
काही सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या खाष्ट सासूच्या भूमिकेला प्रसिद्धी मिळाली. पण, टीव्हीवर दिसणारी ही खाष्ट सासू उच्चशिक्षित आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?

उषा नाडकर्णी या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये ताकदीच्या भूमिका साकारून त्या घराघरात पोहोचल्या.
काही सिनेमांमध्ये उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या खाष्ट सासूच्या भूमिकेला प्रसिद्धी मिळाली. पण, टीव्हीवर दिसणारी ही खाष्ट सासू उच्चशिक्षित आहे असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?
उषा नाडकर्णी यांनी नुकतीच हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयातील करिअरसोबतच बालपणीचे किस्सेही सांगितले.
अभिनय क्षेत्रात येण्याआधी उषा नाडकर्णी या मुंबई महानगरपालिकेत कामाला होत्या. त्यानंतर त्यांनी काही वर्ष बँकेतही नोकरी केली. हे करत असतानाच त्या अभिनयाकडे वळल्या.
त्या म्हणाल्या, "मी ९ वर्ष १० महिने मुंबई महानगरपालिकेत क्लर्क पदावर कामाला होते. त्यानंतर २५ वर्ष मी बँकमध्ये काम केलं".
हर्ष आणि भारतीने उषा नाडकर्णींना शिक्षणाबद्दल विचारताच त्या म्हणाल्या, "हो, मी ग्रॅज्युएट आहे".
"२ मार्च १९६५ रोजी मी बीएमसीत कामाला लागले. २४ जानेवारी १९७५ला मी काम सोडलं. ९ वर्ष १० महिने मी बीएमसीत नोकरी केली".
"त्यानंतर जानेवारी १९७५ मध्ये मी देना बँकमध्ये कामाला लागले आणि २ फेब्रुवारी २००१ पर्यंत २५ वर्ष काम केलं".
"तेव्हाच मी अभिनय क्षेत्रातही काम करत होते. जर मला दुपारी प्रयोगासाठी जायचं असेल तर मी डबा घेऊन जायचे नाही. कारण, डबा खाण्यात १५ मिनिटं जायची. तेवढ्या वेळात मी बाकीचं काम आपटायचे".