लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदारचा पतीदेखील आहे अभिनेता; मराठीसह हिंदी कलाविश्वात केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:45 PM2022-02-28T12:45:00+5:302022-02-28T12:45:00+5:30

Vishakha subheadar: विशाखाच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच माहित आहे. मात्र, तिच्या पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे. त्यामुळेच तिच्या नवऱ्याविषयी जाणून घेऊयात.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार.

विशाखाने आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आज ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

'मस्त चाललंय आमचं', 'येड्यांची जत्रा', 'अरे आवाज कोणाचा', 'झपाटलेला २', 'सासूच स्वयंवर', 'दगडाबाईची चाळ', 'ये रे ये रे पैसा' अशा कितीतरी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

विशाखाच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच माहित आहे. मात्र, तिच्या पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे. त्यामुळेच तिच्या नवऱ्याविषयी जाणून घेऊयात.

विशाखाचा नवरादेखील तिच्याप्रमाणेच लोकप्रिय अभिनेता आहे.

विशाखाच्या नवऱ्याचं नाव अभिनेता महेश सुभेदार असं असून त्यांनी १ जून १९९८ मध्ये लग्नगाठ बांधली.

महेश सुभेदार यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपलं नशीब आजमावलं आहे. अनेक चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

'तक्षक याग', 'लगी तो छगी', 'बेधुंद', 'अशी ही भाऊबीज', 'ही पोरगी कोणाची' या काही नाटक, चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत.

महेश आणि विशाखा यांना एक मुलगादेखील आहे. अभिनय असं त्याचं नाव आहे.