IN PICS : 20 वर्षांनी गेले, आता तिथे कोणीच नाही....! फुलवा खामकर ‘बालपण’ शोधायला जाते तेव्हा...!! By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 04:28 PM 2022-09-16T16:28:32+5:30 2022-09-16T16:43:07+5:30
Phulawa Khamkar : तब्बल 20 वर्षांनंतर फुलवा आजीच्या या घरी बालपण शोधायला गेली. तिथे तिला जे काही गवसलं ते तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. मराठी चित्रपटसृष्टीतील बड्या बड्या कलाकारांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारी नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर हिचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. आज फुलवा जी काही त्यामागचे तिची जिद्द, कष्ट, ध्यास असं सगळं आहे.
लोकप्रिय मराठी गाण्यांसाठी कोरिओग्राफी करणारी फुलवा अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही दिसली आहे. ती उत्तम कथ्थक डान्सर आहे.
सर्वांची आवडती फुलवा सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे आणि सध्या याच फुलवाची एक पोस्ट तुफान व्हायरल होतेय. होय, एक हळवी पोस्ट फुलवाने शेअर केली आहे. या पोस्टसोबत तिने काही फोटोही शेअर केले आहेत.
तर पोस्ट आहे, आजीच्या घराबद्दलची. होय, पुण्यातल्या नाराणपेठेत फुलवाच्या आज्जीचं घर. हे घर आणि बालपणीच्या काही आठवणी तिने शेअर केल्या आहेत.
तब्बल 20 वर्षांनंतर फुलवा आजीच्या या घरी बालपण शोधायला गेली. तिथे तिला जे काही गवसलं ते तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय.
ती लिहिते, जेव्हा माझं बालपण शोधायला मी परत जाते...५२८ नारायण पेठ , मोदी गणपती मागे,पुणे २८.... लहानपणापासून पाठ असलेला पत्ता... माझ्या आजीचं घर. 6 महिन्याची असल्यापासून आई मला एकटीला आजीकडे सोडायची...
पुढे तिने लिहिलंय, आज 20 वर्षांनी गेले. आता तिथे कोणीच नाही...घर पण आता आमचं नाही...पण खूप सुंदर आठवणी आहेत...१९८४ मध्ये बाबा गेल्यावर त्या रस्त्याला ‘अनिल बर्वे पथ’असं नाव दिलंय ती पाटी अजूनही तशीच आहे...
३८ वर्षांनंतर सुद्धा !!!! बाबांचा खूप जवळचा आणि लहानपणीचा मित्र...विलासकाका... गप्पा,आठवणी, अश्रू यात कुठेतरी स्वत: च काळाच्या ओघात गडप होतं, हरवत चाललेलं माझं बालपण सापडलं..., असं तिने लिहिलंय.
आपल्यावर न कळत झालेल्या संस्कारांची मुळं कित्ती घट्ट आणि सुंदर आहेत या जाणिवेने स्वत: वरचा आणि आयुष्यावरचा विश्वास परत एकदा खूप वाढला..., असंही तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.तिच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे. व्वा, किती छान जुन्या आणि सुंदर आठवणी. खूप सुरेख लिहिलंस, अशा शब्दांत अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.