PHOTO: बहारदार नृत्य, भुरळ घालणारं सौंदर्य; 'फुलवंती'च्या मनमोहक अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 05:25 PM2024-09-26T17:25:23+5:302024-09-26T17:35:21+5:30

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिचा आगामी चित्रपट 'फुलवंती' मुळे चर्चेत आली आहे.

सध्या सगळीकडे 'फुलवंती' चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसते आहे.

पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती चित्रपटाच्या माध्यमातून आता प्रेक्षकांसमोर येत आहे.

येत्या ११ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी या चित्रपटामध्ये 'फुलवंती' नावाच्या सुप्रसिद्ध नर्तिकेच्या भूमिकेत दिसते आहे. तर अभिनेता गश्मीर महाजनीदेखील चित्रपटात पाहायला मिळतोय.

दरम्यान, नुकतेच प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

चित्रपटामध्ये नृत्य सादरीकरण करतानाचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये हिरवी नऊवारी साडी त्यावर मरामोळा साज अशा पेहरावात प्राजक्ता पाहायला मिळते आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीचे हे व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.