कलरफूल ब्लेझरमध्ये प्रिया बापटचा हटके अंदाज; लेटेस्ट फोटोशूट पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 05:10 PM2024-09-30T17:10:20+5:302024-09-30T17:19:03+5:30

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिंदी ओटीटीविश्वात स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत आहे.

अशातच स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर प्रियाने IMDB लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत चांगलीच आघाडी घेतली आहे.

अलीकडेच प्रिया तिची 'रात जवान है’ या सिरिजमुळे चर्चेत आली आहे.

या सिरिजच्या प्रमोशनकरिता अभिनेत्रीने लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.

कलरफुल ब्लेझर आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट असा हटके लूक तिने केला आहे.

प्रियाचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

दरम्यान, अभिनेत्रीचा नाटक, सिनेमा ,मालिका तसेच वेबसीरीजमध्ये दांडगा वावर असल्याचा पाहायला मिळतो.

'काकस्पर्श', 'टाईमपास- २' , 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' यांसारख्या मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.