कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी; गळी शोभते सोनेरी सर अन्.., सायली पाटीलचं भुरळ पाडणारं सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 13:18 IST2024-10-26T13:11:06+5:302024-10-26T13:18:10+5:30
सायली पाटील ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अभिनेत्रीने नागराज मंजुळेंच्या 'झुंड' आणि 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
नेटकऱ्यांनी सायलीला 'महाराष्ट्राची क्रश' असा टॅग देखील दिलाय.
'घर बंदूक बिरयानी' जेव्हा रिलीज झाला तेव्हा सायली पाटीलची खूप चर्चा झाली.
सायली सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. रिअल लाईफमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री स्वत:चे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने अबोली रंगाची पैठणी साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे.
फोटोंमध्ये कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अशा पारंपरिक लूकमध्ये सायली खूपच गोड दिसतेय.