PHOTO: १५० वर्षांची परंपरा अन् उभ्या गौराई; सायली संजीवच्या मुंबईतल्या घरी झालं गौरीचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 05:07 PM2024-09-11T17:07:37+5:302024-09-11T17:17:12+5:30

अभिनेत्री सायली संजीवच्या मुंबईतील घरी पहिल्यांदाच गौराईचं आगमन झालं आहे.

देशभरात गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र उत्साह, जल्लोषाने वातावरण भारावून गेले आहे.

लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी सायंकाळी मुंबईत घराघरांमध्ये गौराईचं स्वागत करण्यात आलं.

सर्वसामान्यांसह कलाकार मंडळींही त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री सायली संजीवच्या मुंबईतील घरी पहिल्यांदाच गौराईचं आगमन झाल्याचं पाहायला मिळतंय.

सायलीने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत तिच्या घरातील गौराईची झलक दाखवली आहे.

१५० वर्षांची परंपरा असलेल्या उभ्या गौराई आणि बाप्पा यांचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केल्याचं पाहायला मिळतंय.

सायलीने देखील गौराईच्या स्वागतासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.

पिवळ्या रंगाची नऊवारी त्यावर पारंपरिक साज करत अभिनेत्री माहेरवाशीन गौराईच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

सायली संजीव मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपटात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.