PHOTO: 'तू हुस्न की रानी है... ' पिवळ्या ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचं झक्कास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 06:55 PM2024-10-12T18:55:30+5:302024-10-12T19:05:52+5:30

सोनाली कुलकर्णीचं लेटेस्ट फोटोशूट नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं.

सध्या अभिनेत्री सन मराठी वाहिनीवरील ‘होऊ दे चर्चा… कार्यक्रम आहे घरचा !’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

सोनाली सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.

कधी तिच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेत येत असते.

नुकतेच तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हटके पोज देत नवीन फोटोशूट केलं आहे.

'आजचा रंग आकाशातला... 'असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

पिवळा ड्रेस, कानात झुमके तसेच केस मोकळे सोडत सोनालीने खूप सुंदर पद्धतीने फोटो काढलेत.

दरम्यान, फोटोंमधील सोनाली कुलकर्णीचा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.