सोनालीचा पारंपरिक टच असलेल्या मॉडर्न लूकची चर्चा; नव्या हेअर कटने खुलवलं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 05:17 PM2024-05-29T17:17:01+5:302024-05-29T17:26:38+5:30

मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीकडे पाहिलं जातं.

वेगवेगळ्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करत अभिनेत्रीने चाहत्यांवर मनावर अभिनयाचा ठसा उमटवला.

मोठ्या पडद्यावर अभिनय करताना त्याला साधेपणाची जोड देत सोनालीने अपार लोकप्रियता मिळवली.

सोनालीने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील दिग्दर्शकांना आपल्या कलेची दखल घेण्यास भाग पाडलं.

'अगं बाई अरेच्या 2', 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'सिंघम', 'वेल डन अब्बा', 'दिल चाहता हैं, 'प्यार तुने क्या किया', 'गुलाबजाम' अशा कितीतरी हिंदी, मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.

नुकतेच सोनालीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे समर स्पेशल लूकमधील फोटो पोस्ट केल्याचं पाहायला मिळतंय.

जांभळ्या रंगाच्या कॉटन साडीमध्ये अभिनेत्रीने कमाल पोज देत हे फोटोज क्लिक केलेत.

कपाळावर टिकली, नाकात नथणी तसेच साडी परिधान करत सोनालीने तिच्या पारंपरिक पेहरावाला मॉडर्न टच दिलाय.

या व्हायरल फोटोंमधील सोनालीचा नवा हेअर कट चर्चेत आला आहे.