Photos: चलो इटली! मराठमोळ्या जोडप्याची आणखी एक परदेशवारी, फॅशनेबल फोटोंनी वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 02:47 PM2024-06-28T14:47:02+5:302024-06-28T15:12:06+5:30

सिद्धार्थ-मितालीची युरोप ट्रीप चर्चेत

मराठीतलं सर्वांचं लाडकं कपल सिद्धार्थ चांदेकर(Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) नेहमी कपल गोल्स देतात. त्यांच्यातला मैत्रीचा बाँड आणि नवरा बायकोचं नातं एकदम खास आहे.

आता दोघंही इटलीमध्ये एन्जॉय करत आहेत. इटलीतील त्यांचे फोटो सध्या लक्ष वेधून घेत आहेत. इटलीतलं सौंदर्य त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय.

सिद्धार्थ आणि मिताली दर सहा महिन्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरण्याचा आनंद घेतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची युरोप टूर गाजली होती. पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर दोघांनी मस्त फोटोशूट केलं होतं.

सिद्धार्थ आणि मिताली दोघंही फॅशनबाबतही जागरुक आहेत. सिद्धार्थचा हँडसम तर मितालीचा बोल्ड लूक पाहून चाहते फिदा झालेत.

मितालीने इटलीतील एका ठिकाणी केलेलं हे सुंदर फोटोशूट. इटलीचा नजारा तर काही औरच आहे. पण मितालीही बोल्ड अंदाजात दिसत आहे.

निळ्या रंगाचा टू पीस आणि व्हाईट जॅकेट, नाजूक नेकलेस, ड्रेसला मॅचिंग क्लीप अशा लूकमध्ये मिताली खूपच हॉट दिसत आहे.

तर सिद्धार्थने लेमन -पिंक रंगाचा शर्ट आणि शॉर्ट्स असा फॅशनेबल लूक केला आहे. यात त्याची स्टाईलही कडक आहे.