टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा ते मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू नायक; जाणून घ्या 'या' अभिनेत्याचा थक्क करणारा प्रवास... By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 05:02 PM 2023-12-12T17:02:51+5:30 2023-12-12T17:12:01+5:30
भरत जाधव हे मराठी मनोरंजन विश्वातील एक नावाजलेले नाव आहे. आज या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या मराठी सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.... आपल्या दमदार आणि विनोदी अभिनयाच्या जोरावर भरत जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांमध्ये काम करण्याआधी भरत जाधव यांनी अनेक यशस्वी नाटकांमध्ये काम केल्याचे पाहायला मिळते.
गलगले, दामू, मोरूची मावशी अशा अनेक नाटकांचे प्रयोग त्यांनी यशस्वी केले आहेत. एकांकिका, चित्रपटांमध्ये काम तसेच नाटक असा प्रवास या अभिनेत्याने केला. भरत जाधव यांचा जन्म १२ डिसेंबर १९७३ मध्ये झाला. कोल्हापुरच्या या पठ्ठ्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत.
मुंबईच्या परळ येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भरत जाधव यांची संघर्षगाथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे. टॅक्सी ड्रायव्हरचा मुलाने मराठी कलाविश्वात स्वत; ची वेगळी छाप उमटवली आहे.
आजच्या घडीला मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत भरत जाधव हे नाव येते. ऑल दे बेस्ट या नाटकामुळे भरत जाधव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले.
मराठी रंगभूमी तसेच मराठी चित्रपट गाजवणारा हा अभिनेता मराठी मनोरंजन विश्वात आघाडीचा नायक बनला आहे. भरत जाधव यांच्या गलगले निघाले, साडे माडे तीन, मुक्कम पोस्ट लंडन, नामदार मुख्यमंत्री गंप्या गावडे,जत्रा,खबरदार, पछाडलेला यांसारख्या अस्सल विनोदी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.