महाराष्ट्राची आर्ची झालेल्या रिंकू राजगुरुचं खरं नाव माहितीये का? By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 01:30 PM 2022-02-10T13:30:40+5:30 2022-02-10T13:34:22+5:30
Rinku rajguru: रिंकू राजगुरु या नावाने घराघरात पोहोचलेल्या रिंकूचं खरं नाव हे नसून अन्य दुसरंच आहे. शाळा-कॉलेजमध्ये रिंकू एका वेगळ्याच नावाने ओळखली जाते. आख्ख्या महाराष्ट्राला येड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
नागराज मंजुळे यांच्या सैराटमधून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली.
सैराट या चित्रपटात रिंकूने आर्ची ही भूमिका साकारली होती. गावाकडे राहणारी पण स्वभावात रांगडेपणा आणि बिंधास्तपणा दाखवून तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं.
आज उभ्या महाराष्ट्रात रिंकूला ओळखत नाही असं म्हणणारा क्वचितच एखादा सापडेल.
सैराट या चित्रपटानंतर रिंकू, मेकअप, कागर या मराठी चित्रपटांमध्येही झळकली.
आज मराठी कलाविश्वात रिंकूच्या नावाचा एक दबदबा आहे. विशेष म्हणजे अल्पावधीत लोकप्रियता मिळवणारी रिंकू दिग्गज अभिनेत्रींपैकी असल्याचं म्हटलं जातं.
अकलूजमध्ये लहानाची मोठी झालेली रिंकू सगळीकडे आर्ची किंवा रिंकू याच नावाने ओळखली जाते. परंतु, तिचं खरं नाव रिंकू नाहीच.
रिंकूचं खरं नाव फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळेच तिचं खरं नाव काय ते पाहुयात.
रिंकू राजगुरु या नावाने घराघरात पोहोचलेल्या रिंकूचं खरं नाव हे नसून अन्य दुसरंच आहे. शाळा-कॉलेजमध्ये रिंकू एका वेगळ्याच नावाने ओळखली जाते.
रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू असं आहे. पण, तिचं खरं नाव प्रेरणा असल्याचं फार कमी जणांना माहित आहे.