marathi singer-savanee-ravindra share red designer gown photo
डिझायनर आऊटफिटमध्ये सावनीचा ग्लॅमरस अंदाज; नेटकऱ्यांच्या खिळल्या नजरा By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 05:25 PM2024-02-13T17:25:12+5:302024-02-13T17:34:26+5:30Join usJoin usNext Savanee ravindra: सावनी तिच्या गायनासोबतच लूककडेही तितकंच लक्ष देते. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणजे सावनी रवींद्र. मराठीसह तेलुगू, तामिळ भाषांमध्येही सावनीने गाणी सादर केली आहेत. आज लोकप्रिय गायिका म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. सावनी तिच्या गाण्यासोबतच तिच्या लूकबाबतही प्रचंड सजग आहे. सावनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या नेटकऱ्यांमध्ये सावनीच्या ग्लॅमरस लूकची चर्चा रंगली आहे. सावनीने लाल रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिचं फोटोशूट केलं आहे. सावनी या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसून येत आहे. त्यामुळे तिच्या फोटोवर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत. सावनीचे हे फोटो bharat pawar photography यांनी क्लिक केले असून मेकअप thevinod sarode यांनी केला आहे. सावनीने चंद्रमुखी 2 या सिनेमातील ये मन तुम्हें, ये तन तुम्हें" हे गाणं गायलं आहे.टॅग्स :सेलिब्रिटीसंगीतबॉलिवूडCelebritymusicbollywood