माझ्या नवऱ्याची बायको: KD ची पत्नीदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री; Photo पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 20:01 IST2021-10-06T19:52:57+5:302021-10-06T20:01:56+5:30
Abhijit guru lovestory: अभिजित गुरूने ‘अवघाची संसार’ या मालिकेद्वारे संवादलेखनाला सुरुवात केली. तर समिधाने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत गुरु.
मालिकेमध्ये KD ही भूमिका साकारून अभिजीतने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. परंतु, केडी अभिनेता असण्यासोबतच उत्तम पटकथालेखक आणि संवादलेखक देखील आहे.
अनेक मालिका, चित्रपट यांच्यासाठी पटकथा लिहिणाऱ्या अभिजीतची पत्नीदेखील कलाविश्वात सक्रीय असून ती मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिजीतच्या पत्नीचं नाव समिधा गुरु असं असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
समिधा आणि अभिजीत शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे प्रथम या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
विशेष म्हणजे समिधा किंवा अभिजीत यापैकी कोणीही एकमेकांना प्रपोज केलेलं नाही. मात्र, एकमेकांना त्यांच्या मनातील भावना समजल्या आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.
अभिजित गुरूने ‘अवघाची संसार’ या मालिकेद्वारे संवादलेखनाला सुरुवात केली. तर समिधाने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अभिजीत आणि समिधाचा एक खास फोटो
समिधा सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
समिधाने केलेलं खास फोटोशूट