बाई गं...! नेहा खानने लेटेस्ट फोटोशूटमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:53 IST2024-11-19T11:42:47+5:302024-11-19T11:53:08+5:30
Neha Khan : अभिनेत्री नेहा खान हिने नुकतेच फोटोशूट केले आहे, ज्यात तिने फिगर फ्लॉन्ट केलीय.

अभिनेत्री नेहा खान मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकतीच ती बाई गं या सिनेमात दिसली होती.
नेहा खान सिनेमाव्यतिरिक्त ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच नेहाने ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
नेहा खान हिने ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट केलंय. यात तिने ब्लॅक क्रॉप टॉप, त्यावर ब्लेझर आणि लाँग पँट परिधान केलीय.
यात नेहा खानने या फोटोशूटमध्ये फिगर फ्लॉन्ट केलीय.
नेहा खानच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
नेहा खानने शिकारी या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. तिने साउथ इंडस्ट्रीतून करिअरची सुरूवात केली होती.
तिने मालिकेतही काम केलंय. देवमाणूस २मध्ये ती काम करताना दिसली होती.
शिकारी चित्रपटानंतर ती 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती.
याव्यतिरिक्त ती झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये सहभागी झाली होती. त्यात तिने नृत्याची झलक दाखवली होती.
नेहा खानने हिंदी मालिकेतही केलंय काम