PHOTOS: विना मेकअपमध्येही सोनाली कुलकर्णी दिसते तितकीच झक्कास, पहा साडीतील तिचं मनमोहक सौंदर्य

By तेजल गावडे | Updated: October 13, 2020 19:33 IST2020-10-13T19:25:49+5:302020-10-13T19:33:00+5:30

विना मेकअप लूकमध्येही सोनाली कुलकर्णीच्या नथीने आणि सोज्वळ सौंदर्याने वेधून घेतले सर्वांचे लक्ष

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

सोनाली सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.

नुकतेच सोनालीने पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने साडीसोबत नाकात नथही घातली आहे.

विशेष बाब म्हणजे, सोनाली कुलकर्णीने विनामेकअप लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

विनामेकअपही सोनालीचे सौंदर्य पाहून चाहतेही फिदा झाले आहेत. 

सोनालीचे साडीतील सोज्वळ सौंदर्याचे चाहते प्रशंसा करत आहेत.

सोनाली शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती.

सध्या सोनाली डान्सिंग क्वीन शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.