गुलाबी साडी अन् कपाळी चंद्रकोर, अमृता खानविलकरचा मराठमोळा साज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:16 AM2024-09-23T11:16:07+5:302024-09-23T11:24:57+5:30

Amruta Khanviilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

अमृता खानविलकर प्रोजेक्टसोबत ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच अमृताने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.

यात अमृताने गुलाबी रंगाची साडी कपाळी चंद्रकोर, हातात हिरव्या बांगड्या आणि केसांचा आंबाडा बांधून त्यावर गुलाबाची फुले माळली आहेत.

अमृता खानविलकरने मराठमोळा साज करून फोटोशूट केले आहे. यात ती खूप सुंदर दिसते आहे.

अमृता खानविलकरचे हे फोटो चर्चेत आले आहेत. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.